सावधान!! लोणावळा जायचा प्लान करताय? मग हे बघाच!

By - Mahiti Keeda

04 Aug 2024

All Image - Social Media

आज रविवार असल्याने टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट आणि भुशी धरण येथे पर्यटकांनी गर्दी केली होती. 

लोणावळ्यातील कार्ला गडावर आई एकविरा च्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांची चांगली तारांबळ उडाली. 

पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. 

भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसून पावसाचा आनंद घेण्याची इच्छा आज पर्यटकांची अपूर्ण राहिली. 

कारण, मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह प्रचंड प्रमाणात वाढला होता. भुशी धरणाच्या पायऱ्यांवर उतरणे अशक्य होतं. 

दुसरीकडे आई एकविराच्या कार्ला गडाला धबधब्याचे स्वरूप आलं होतं. पायऱ्यांवरून ओसंडून पाणी वाहत असल्याचं पहायला मिळालं. 

कार्ला गडावर आई एकविरा च्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांची चांगली तारांबळ उडाली.  

अति मुसळधार पाऊस झाल्याने गडाला धबधब्याचे स्वरूप आलं होतं. पावसाचे पाणी थेट पायऱ्यांवरून खाली आलं. 

गडाच्या विविध ठिकाणाहून पाणी येत असल्याने पायऱ्यांवर देखील धबधब्याप्रमाणे जोरात पाणी वाहत होतं.